दुर्गदुर्गेश्वराचा वाघदरवाजा...

दुर्गदुर्गेश्वर रायगडाचा हा वाघदरवाजा. कोंडेखळीच्या खळग्यात अति गचपणात दडलेला हा दरवाजा. शिवरायांच्या चौकस व दूरद्रुष्टी नजरेचे जातिवंत उदाहरण. रायगडाच्या इतर द्वारांच्या मानाने काहीसा उपेक्षित. पण हा वाघ दरवाजा साक्षीदार ठरला एका ज्वलज्वलंत ऐतिहासिक क्षणाचा. माझी ही रानफुलांची शब्दओंजळ त्या वाघ दरवाजास बहू आदरे समर्पित...




आयुष्यभर ऊपेक्षिताचा जरी वाहीला भार
परि हेच ते वाघद्वार
प्रुथ्वीमोल त्या महानाट्याचे ठरले साक्षीदार

या तटबुरुजांसी, चिऱ्याचिऱ्यांसी लावा कान जरा
वाहे यातुनी अविरत खरा
परमोज्ज्वल त्या इतिहासाचा शत शत अम्रुतझरा

स्वराज्य गिळण्या दुर्गेश्वराच्या भोवती पडले फास
सुटण्या करावा काय प्रयास?
सुखरूप निघण्या निवड जाहली, याची त्या समयास

बहू भाग्यवंत हा वाघ दरवाजा, गाऊ कवने किती!
कुंठीत माझी दुबळी मति
स्वराज्य रक्षिण्या इथुनी निसटले तिसरे छत्रपती

अनंत हो ऊपकार तयाचे, महाराष्ट्राच्या भाळी
ही रात्र मिटवण्या काळी
ग्रहणामधुनी करी मुक्त हा, प्रदीप्त अंशुमाळी

त्या स्वराज्याचा हो पिऊनी वारा, घडले हे फत्थर
बुलंद, अजिंक्य नि कणखर
ज्यांच्यावरती ऊभे राहीले, हे स्वराज्याचे मंदिर

त्याच ऋणांची जाण ठेऊनी, पळभर येथे बसा
त्याला ख्यालखुशाली पुसा
अन् याच्याकडुनी भरूनी घ्या, हा अजिंक्यतेचा वसा...




लेखन- संतोष अंकुश सातपुते
छायाचित्र प्रेमाभार- वैभवदादा पाटील

Comments

  1. चित्रमय भाषा.. वाह संतोष...

    ReplyDelete
  2. Chanach Santosh.... Goshtirupat aikayla ankhin
    avadel...

    ReplyDelete
    Replies
    1. खूप धन्यवाद... नक्कीच मलाही करायला आवडेल ते

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

शिवराजाभिषेक

माझे माहेर रायगड

दुर्गराज राजगड भाग १