आईसाहेब जिजाऊ
१७ जून. अवघ्या राज्याभिषेकाच्या अकराव्या दिवशी या माऊलीनं शिवरायाचा, स्वराज्याचा, जगाचा निरोप घेतला. अवघी हयात ज्या स्वप्नासाठी घालवली, ते पार पडताच सर्व मायेचे पाश तोडून या माऊलीनं स्वर्गाची वाट धरली. हा म्रुत्यू नव्हे, ती होती समाधी. आपलं कार्य पूर्ण होताच जी थोर योगी, संत घेतात ती समाधी. पण यावेळी राजाची अवस्था काय असेल. आईविना पोर ते. छे छे कल्पनाही साहवत नाही. पाचाडच्या वाड्यात जिजाऊंच्या त्या चिरशांत देहाकडे पाहत तिचा सिऊबा म्हणत असेल...
शोधशोधुनी आई तुजला, येई जीव कंठाशी
सोडुनी तव बाळास एकटी, गेली कोणत्या देशी
हरिणीवाचून पाडस मी गं, भयाण काटेवनी
सैरावैरा चहूकडे, हाकारी भेकभेकूनी
कानोसा घेण्या क्षणैक थांबे, काने टवकारुनी
जननीची परि साद येईना कासावीस कानाशी
सोडुनी तव बाळास एकटी, गेली कोणत्या देशी
अभिमाने गगनोंच जाहली, होती ज्याची मान
तो रायगिरीही पायामध्ये, बसे शीर खुपसून
रडती, स्फुंदती अनाथ झाला तो ही तुजवाचून
किलकील करूनी लोचन त्याचे, भिडती पाचाडाशी
सोडुनी तव बाळास एकटी, गेली कोणत्या देशी
पहा वासरे, अवघ्या गाई, अखंड ढाळी नीर
शोकाकूल ती मुकी पाखरे, शोधी तुज भिरभिर
वाड्याच्याही चिऱ्याचिऱ्यांचे सुटू लागले धीर
व्रुंदावनीची विझली पणती, तमी बुडाल्या तुळशी
सोडुनी तव बाळास एकटी, गेली कोणत्या देशी
सुखसोहळ्याच्या संगमी अवघे, स्वराज्य होते स्नात
दुष्ट नियतीने पुनः सौख्यावर केला वज्राघात
काल जाहलो नाथ जनांचा, आज स्वतः अनाथ
राजाभिषेक सोहळ्याची का सांगता ही अशी?
सोडुनी तव बाळास एकटी, गेली कोणत्या देशी
एकट्यासी मज सोडुन गेली, निर्जल बेटावर
मधे ऊभा मी, अवतीभवतीनं अमोप जनसागर
डोंब ऊसळला तहानेचा, परी नीर ना ओंजळभर
तव वात्सल्याचा अम्रुतपान्हा वेगे धरी मुखाशी
सोडुनी तव बाळास एकटी, गेली कोणत्या देशी
सिंधुजलासह शतसरीतांनी घालून मजला स्नाना
ते सुकण्या आधी आटविला मायेचा अम्रुतपान्हा
ऐकू येईना आक्रोशारव, चरणी करी तुझा तान्हा
सांग एवढी कठोर झाली, ममता तुझी गं कशी
सोडुनी तव बाळास एकटी, गेली कोणत्या देशी
धारण केले जरी शिरी या, सुवर्णमौक्तिक छत्र
तव पदराची शीतळाई का येई त्या तिळमात्र
जयापुढे हतवीर्य दाहक, विपदांचे शतमित्र
सातही गगने ठरे थोटकी, अपूर्ण तया तुलेशी
सोडुनी तव बाळास एकटी, गेली कोणत्या देशी
म्हणतील अवघे छत्रपति मज, म्हणेल राजे कोणी
पुकारेल मज पदव्या, अल्काबी नूतन जयघोषांनी
परि "शिवबाबाळा" हाक पुन्हा का येई अभागी कानी
संजिवनीची प्रकटे मात्रा, जणू त्या हाकेसरशी
सोडुनी तव बाळास एकटी, गेली कोणत्या देशी
कणखर कर जे सदैव ऊठले धर्मरक्षणासाठी
आशिर्वच वा महन्मंगल दिव्य स्थापण्यासाठी
दानास्तव वा आधारास्तव दीनदुःखितापाठी
तेच सुबाहू पसरूनी घे ना, कवळुनी मला ऊराशी
सोडुनी तव बाळास एकटी, गेली कोणत्या देशी
चंचल चपला, तडिल्लता का शोभावी निपचित
जगोध्दारी, जलौघ जान्हवी व्हावी का खंडीत
भ्रमणविरहीत होई अभंग गतिज झंझावात
मूर्तिमंत तू स्फूर्ति आज का अशी म्लानता लेशी
सोडुनी तव बाळास एकटी, गेली कोणत्या देशी
वैर साधुनी सागर घे जणू प्रवाह शुष्क करून
भर मध्यान्ही, ऊष्ण वालुकी, तडपे जलविन मीन
या ह्रदयाची स्थिति आगळी, नाही त्याच्याहून
ही तडफड, तगमग क्षीण होऊनी जाई पार लयाशी
सोडुनी तव बाळास एकटी, गेली कोणत्या देशी
सोडुनी तव बाळास एकटी, गेली कोणत्या देशी ...
–-------------------------------/-----------
शब्द- संतोष अंकुश सातपुते
छायाचित्र- नेट प्रेमाभार

Khoopach sundar nehmipramane.... 😊
ReplyDeleteधन्यवाद निशांतभाऊ
ReplyDeleteDada khupach chhan
ReplyDeleteखूप आभारी......
Delete