मार्केटिंग माणुसकीचं
प्रसंग पहिला
१५ऑगस्ट. शिवार्थचा पहिला वाढदिवस. एका नामांकित ज्वेलर्सच्या दुकानात काहीतरी दागिना करावा या हेतूने गेलो. पाहता पाहता मुलास सोन्याचे पान, नवीन साखळ्या नि बरच काही खरेदी केलं. पान पटवून मुलाच्या गळ्यात घालावं म्हणून बाहेर आलो तर तिथला पटवेकरी आला नव्हता. बऱ्याच ठिकाणी पाहिलं. पण स्वातंत्र्यदिनामुळे दुसरे पटवेकरीच दिसेना. खूप शोधल्यावर एक मावशी बसलेल्या दिसल्या. त्यांना पान पटवायला दिले. त्यांचा हात सराईतासारखा सुरु झाला. हा हा म्हणता काळा दोरा, मधी सोनेरी धागा, त्यावर पान, पान सरकू नये म्हणून आणखी सोनेरी धाग्याने गच्च करीत त्यांनी आमच्याशी गप्पा मारता मारता ते मुलाच्या गळ्यात बांधलेदेखील.
किती झाले?
३० रुपये
मी पैसे दिले. पैसे घेता त्यांनी आम्हाला थांबायला सांगितले. व त्या कुठेतरी लगबगीनं गेल्या
जेव्हा परतल्या तेव्हा त्यांच्या हातात ४० ची कॅडबरी होती. जी त्यांनी मुलांसाठी आणली होती. आमच्या नवराबायकोच्या बोलण्यातून त्यांना समजले कि आज पोराचा वाढदिवस आहे. मग रिकाम्या हातानं कसं पाठवायचं म्हणून ही कॅडबरी. आम्ही दोघेही त्या प्रसंगानं थक्क होतो. आमच्याकडून त्या मावशीची कमाई किती झाली तर ३०रू आणि खर्च ४०रू. व्यवहाराचं हे गणित माझ्या समजण्यापलीकडचं होतं..
प्रसंग दुसरा
संक्राती निमित्त मुलांना कपडे घेतले व दुकानातून बाहेर पडलो. रस्त्यावर बरेच फळवाले बसले होते. इतक्यात शिवाज्ञा एका मावशींपुढे जाऊन उभी राहिली. त्या मावशींनीही हसत तिला टोपलीतील दोन केळी दिल्या. मी नको म्हणत असताना त्या मावशींनी जबरदस्तीनं दिल्याचं.
अहो राहू द्या हो. देव कंच्या रूपानं ईल सांगता येतं का?
अहो मावशी ती घरी खात नाही आणि इथं...
अहो असच असत लेकराचं.
मी उगी त्यांचं नुकसान नको म्हणून त्यांच्याकडे एक डझन केळी खरेदी करू लागलो. तर म्हणाल्या
" हे बघ पोरा, खरच घ्याची असली तर घे. उगाच पोरीला दोन दिली म्हणून जबरदस्तीनं नग घेऊस.''
मी द्या म्हणालो व एका डझनास कमी द्या कारण आधीच तिला तुम्ही दिलीत असं म्हणालो तर
"दोन केळी खाल्ली माझ्या नातीने एवढं काय त्यात.'' म्हणून मला पुन्हा बाराच केळी दिली.
वरील दोन्ही प्रसंगाचा जेव्हा विचार करतो. पहिल्या प्रसंगात भरमसाठ खरेदी करूनही त्या ज्वेलर्सच्या इथं साधं मुलास शुभेच्छा ही दिल्या नाहीत याउलट पटवेकरी मावशीकडे आलेला अनुभव मात्र वेगळाच होता. तोच अनुभव कपडे खरेदी केल्यानंतर केळी खरेदी करताना आला.
तस पाहिलं तर या दोन्ही मावशी अडाणी. पण जे भल्याभल्या बिझनेसवाल्याना नाही कळत ते व्यवसायातील माणुसकीच गणित त्यांना पक्क जमलं होतं. ते गणित म्हणजे आलेल्या माणसास प्रत्येकवेळी गिर्हाईकाच्या रांगेत न उभं करता. माणुसकीच्या नात्यानं जवळ घ्यावं.
क्लाएंट सर्व्हिसिन्ग , कस्टमर्स डिमांड, बिझनेस स्ट्रॅटेजी असले शब्द त्यांनी कधी ऐकलेही नसतील. पण आलेल्या माणसास केवळ नफा-तोट्याच्या तराजूत न तोलता माणुसकीने जोखण्याची कला त्यांच्याकडे आहे. जे कोणत्याही कॉलेज मध्ये शिकवले जात नाही. ते शिकवलं जातं जीवनाच्या शाळेत... आणि त्या डिग्रीचं नाव आहे ....मार्केटिंग माणुसकीचं
------------------------------------------------------------------------------------------------
लेखन -© संतोष अंकुश सातपुते
फोटो - नेट साभार

This comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteHo na dada. Kharach aaplyala shreemant kartat he anubhav
DeleteDada khup Dhanyawaddd. Tumchyasarkhe vachnare aahe mhanun lihayla Bal yet
ReplyDeleteMast santosh Mast lihil ahes
ReplyDeleteसुंदर अनुभव. मांडलाय पण छान. अशा सकारात्मक गोष्टींना उजाळा देणं खूपच महत्त्वाचं आहे. नाहीतर आपलं आयुष्य यांत्रिक , रूक्ष आणि निव्वळ व्यावहारिक होईल.
ReplyDeleteDhanyawaddd
ReplyDeleteKhup Dhanyawaddd . Ast comment milyawar lihayla ajun sfurti milate
ReplyDeleteमस्त अनुभव 😊👌
ReplyDeleteधन्यवाद प्रसाद भाऊ
DeleteWa... Khoopach sundar... Sarwani awarjun wachava asa lekh... " Marketing Manuskicha"
ReplyDelete