शिवराय कवनस्तुती
देवांच्या दरबारात ब्रम्हदेवाने छत्रपती शिवाजी महाराज यांची गायलेली कवनस्तुती
सकल गुणांनी मंडित करूनी साकरुनीया नर
दिला धाडूनी अवनीवर
सुभाग्य घडविण्या महाराष्ट्राचे पुरुषोत्तम शेखर
शौर्य, पराक्रम वर्णिल ज्याचे केवळ ब्रहस्पति
लेखनी धरुनीया हाती
सज्ज स्वयेश्री लिहण्या केवळ सरस्वती गणपती
क्षमेहुनी जो क्षमाशील निर्मळ गंगा उदकापरी
ध्येये अतुल्य ज्याच्या उरी
तडिलतेविन करु ना शकले याची बरोबरी
चातुर्यापुढती याच्या ठरतो सिंधू सागर उणा
दिपवी शौर्ये हनुमाना
कर्तृत्वापुढती वदे हिमालय, मी हो किती ठेंगणा
कौटिल्या लाजवी मुत्सद्देगिरी झेप ती पंचानना
वधी जो दुष्ट खली दुर्जना
जननीपरि जो धरी ह्रदयासी अवघ्या प्रजाजना
बंदिवान जे परशाहिचे दुर्ग वाही यातना
धिदल्या जडास त्या चेतना
ते सदैव ठरले यासी जयश्री क्षेत्र समरांगणा
दरीखोऱ्यातून हिंडत होते जे जे वानरापरी
जमवुनी त्यांसी परोपरी
अभंग चेतवी स्वराज्यकांक्षा त्यांच्या मनमंदिरी
ज्या हाती होते नांगर, कानस, करवत, वेद वा अरी
खडगे देऊनी त्यांच्या करी
घडवी अजिंक्य सुबाहू कणखर बुलंद सह्यापरी
निरापराधी शोणिते ना खडग कधी माखले
देवधर्म ज्याने राखले
वैरीही तया चारित्र्याचे देई सदा दाखले
सत्तारूढ असुनी कधी ना आत्मसुखा भोगी
रत जगहित उद्योगी
श्रीसमर्थ म्हणती याच्यापरी हा श्रीमंतयोगी
अगाध हो गुणसंचय याच्या गाऊ कवना किती
कुंठीत माझ्या चारही मती
त्रिवार अशक्य पुन्हा निर्मिणे मज ही नराक्रुती
शिवराजा छत्रपती...
कवी संतोष अंकुश सातपुते
९५४५८६४०५५

जय शिवराय 🙏
ReplyDeleteजय शिवराय भाऊ
ReplyDeletekhupach mast lihita..
ReplyDeleteKhup aabhari aahe
DeleteThis comment has been removed by the author.
Delete