शहीद, प्रणाम हा स्वीकारा....

अवघ्या देशा नयनी दाटे
अविरत अश्रूधारा...
शहीद, प्रणाम हा स्वीकारा...

तोंड लपवुनी घरी एकांती
वडील मुक्याने आसू ढाळीती
धरूनी राखी घट्ट ऊराशी
बहीण कुणी ती टाहो फोडिती
श्वास गोठवी ह्रदयी आई, टक लावून बसली दारा...
शहीद, प्रणाम हा स्वीकारा...

धन्य धन्य ते तुम्ही
धन्य ते माय-तात तुमचे
शीर तळहाती घेऊनी करीती
रक्षण देशाचे
भारतभूच्या लज्जेस्तव हो
तुम्ही वेचले प्राण
अभिमानाने वदतो भारत
"तुम्ही खरे संतान "
श्वास आमचे ऋणाईत तुमचे, ना उपमा उपकारा...
शहीद, प्रणाम हा स्वीकारा...

शपत घेऊनी वदतो
लावील नीज प्राणांची शर्त
पृथ्वीमोल बलिदान परि हे
न जाऊ देईल व्यर्थ
भारतभूसाठी तुम्हासम
व्रत खडतर घेऊ अंगी
वक्र दृष्टिने पाहता कोणी
तिथेच ठेचू नांगी
या मातीच्या कीर्तिसाठी उधळू प्राण बेलभंडारा
शहीद,  प्रणाम हा स्वीकारा...

शब्द न केवळ व्यर्थ वांझोटे, हा मंत्र सदैव पुकारा
शहीद, प्रणाम हा स्वीकारा...


संतोष सातपुते

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शिवराजाभिषेक

माझे माहेर रायगड

दुर्गराज राजगड भाग १