Posts

शिवराजाभिषेक

Image
शिवराजाभिषेक! केवळ एका व्यक्तिस सिंहासनावर बसविण्याचा हा सोहळा मुळीच नव्हता. ती होती एक संकल्पपूर्ति! माहुलीवर पदरी वैफल्य आलेल्या शहाजीराजांची संकल्पपूर्ति! पुण्याच्या काळजात रूतलेली पहार ऊपसणाऱ्या जिजाऊंची संकल्पपूर्ति! रोहिडेश्वराच्या गाभाऱ्यात एका चिमुरड्याने घेतलेल्या भीष्मप्रतिज्ञेची नि त्यासाठी ऊपसलेल्या भगीरथ प्रयत्नांची संकल्पपूर्ति...  स्वामीनिष्ठेपुढे बादशहाचा कौल लाथाडणाऱ्या मुरारांची! गजापुरच्या खिंडीत तोफेच्या सरबत्तीची वाट पाहणाऱ्या बाजींची! क्षणात वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजींची! येसाजी! तानाजी! शिवा- बाजींची संकल्पपूर्ति! या मातीसाठी जिवाचा बेलभंडारा ऊधळणाऱ्या कित्येक ज्ञात- अज्ञात वीरांची संकल्पपूर्ति! कैक सुवासिनींच्या सुन्या कपाळांची संकल्पपूर्ति! कैक मातांच्या विझलेल्या वंशदिव्यांची संकल्पपूर्ति! या अवघ्या अवघ्यांची संकल्पपूर्ति मूर्तिमंत रूपात अवतरली या रायगडी! रामदेवराय यादवाच्या रूपानं पदच्यूत झालेली महाराष्ट्र अस्मिता शिवछत्रपतींच्या रूपानं पुन्हा मानानं सिंहासनाधिष्ठीत झाली. देवगिरीवर मरणासन्न झालेल्या महाराष्ट्रधर्मास या रायगिरीवर नव...

माझे माहेर रायगड

Image
पावसाळा नुकताच ऊंबरठ्यावर येऊन ऊभा राहीलेला. चार सहा पाऊस गाठभेट घेऊन गेलेले. त्यावेळी मी, केतन, सागर, नंदन चौघेही रायगडी निघालो. मुक्काम किती? ऊणेपुरे आठ दिवस! ते आठ दिवस आम्ही शिवकाळातच जगत होतो.कोणी विचारेल काय केलं रायगडी या आठ दिवसात? तर काहीच नाही! चौघेही सासुरवाशीनीसारखे संसार सोडून माहेराला आलो होतो. माहेरी थोडीच काय करायचं असतं! ईथं फक्त बागडायचं! माहेरच्या गोतावळ्यात मनमुराद रमायचं! त्यांच्याकडून फक्त लाड पुरवून घ्यायचे. दिवस, तारीख, वेळ यांच्याशी काडीमोडच घेतलेला. कोणीही विचारावं आज दिवस कोणता? फिरायचा! आणि सकाळ, दुपार, सांज, रात्र याशिवाय दूसरी वेळ नव्हती. सकाळी ऊठून बाम्हण वाड्याच्या ओहोळेनी खाली वाघदरवाज्याकडे निघायचं. ही वाट जरा अडचणीची! तरी निघायचो. मरणाची खेकडं गोळा करीत. पावसानं झऱ्यांना पाझर फुटलेला. वर ओहोळेच्या ऊगमाशी थेंबथेंब ठिपकणारं पाणी खाली मोठमोठ्या डकल्यातून शिगोशिग भरून वाहावयाचं. इथं भडाभडा पाणी अंगावर घेत आंघोळी ऊरकल्या की आम्ही वाऱ्यासारखे गडावर दसदिशी ऊंडारायला मोकळे. जायचं कुठं हा प्रश्नच पडत नव्हता. फुटतील त्या वाटेने अथवा वाट नसेल...

दुर्गराज राजगड भाग १

Image
राजगड! मुरुंबदेवाचा डोंगूर! बिरमऋषीचा डोंगूर! ब्रह्मर्षीचा पर्वत. ईये महाराष्ट्र मुलूखाचे ठाई वसला राजगड. अनादी काळापासून. ऊंच गगनात डोकं खुपसून. पायतळीची रहाळीची माणसच काय, जनावरदेखिल या खडककड्याशी झोंबायला धजावायचं नाही. अन् एकेदिनी हा गगनकडा येंगून वर चढला तपस्वी बिरमऋषी. या विजनस्थळी. एकांती! जनस्थानापासून विमूक्त अशा जागी. राजगडास पहीला मानव स्पर्श घडला तो असा. या राजस, तपस्वी साधकाच्या स्पर्शानं थरारला राजगड. तो बसला तपाला. अन् घुमू लागला अभिमंत्रीत वेदघोष अवघ्या डोंगरावर. दशदिशांनी! राजगडही विरक्त झाला! टीचभर घरासदेखिल घरपण देण्यास लागतो स्त्रीचा हात. अन् हेच ध्यानी धरून त्या चारसहा सवाष्णी गड येंगून वर आल्या. दक्षिण बाजुनी मळ्याचा अवघड दांड मोठ्या ठसक्यात चढून आली काळेस्वरी. गुंजिवण्याच्या निबीड रानातून वाट काढीत दारावर येऊन विराजली गजांतलक्षुमी! बालेकिल्ल्याखालच्या गच्च रानात विसावली रेडजाई! बालेकिल्ल्याचा आडदांड ऊभार येंगून ऊगवतीस तोंड करून विराजली मायजननी. अन् चोरदिंडीच्या वळणवाकणातून कड्या कपारीस भिडून ऊत्तर अलंगेवर वसली माय पद्मावती. आधीच गड तपस्वीच्या ...
Image
सुधागडावर महाद्वाराला कवाड बसविण्यास ज्या ज्या निष्ठावंत शिवपाईकांनी, धुलीकणांनी मोलाची कामगिरी साधली त्यांच्या सन्मानास्तव.... हे कवणपुष्प.... नटला दिमाखदार, सुधागड नटला दिमाखदार त्रिशतकांती कवाड लाभे, ऊघडले महाद्वार शिवकाळी या स्वराज्याप्रति सुधागडाची दूर्ग आक्रुती पाहुनी जडली शिवबा प्रीति "बुलंद होई राजधानी का?" राजा करी विचार शिवकाळाचे वैभव सरले कालचक्राचे जाते फिरले परवशतेचे जगणे ऊरले गिळून टाके गडास अवघ्या, दूर्लक्षित अंधार रणफंदी बा रायगडीचे शोभे मावळे गतजन्मीचे दुःख जाणिले सुधागडाचे धूलीकणांनी मनी ठाणला, संवर्धन निर्धार ठिणगी चमके एक मनातुनी सहस्त्र वणवे चेतले यातुनी शिवकार्याचा वसा घेऊनी हा हा म्हणता घेऊ लागले, स्वराज्य पुनः आकार शिवभक्ती ये दाटूनी पोटी महाद्वाराच्या पूर्तिसाठी रणवीरांच्या लवल्या पाठी शत शत राबती हात, मुखी शिवबा जयजयकार कुणी धनाने, कुणी मनाने प्रज्ञेने कुणी, कुणी श्रमाने अवघे झटले एक दिलाने धूसर होते स्वप्न जाहले मूर्तिमंत साकार मनी ना कुठले किंतु, परंतू वानरगण जणू बांधे सेतू तसा शिवराय मनी...

या मराठमुलुखी बाळ जन्मले, शिवबा छत्रपती...

Image
गुलामगिरीच्या काळ्याकुट्ट घोंगडीखाली झोपलेला महाराष्ट्र त्या राती खडबडून जागा झाला. अवघा सह्याद्री धोतराचा सोगा धरून, नीऱ्यांचा घोळ सावरीत धावू लागला. त्यासोबत होती त्याची दहाबारा तरणी, हुमानदांडगी पोरं. अन् चिमखड्या परकरी पोरी. सह्याद्रीची ती पोरं म्हणजे हे राकट गडकोट आणि चिमखड्या पोरी म्हंजी त्यावरून धावणाऱ्या नद्या. ही सगळीच नटूनथटून धावत होती. अन् त्यांच्यासोबत पदराआड बाळंतविडा झाकून धावत होती महाराष्ट्र मुलखातील देवदेवता. कुठं? जुन्नरपेठेत!कशाला??? निद्रीत अवघा महाराष्ट्र हा, ऊठला खडबडून पहा देई भिरकावून परवशतेची जख्ख घोंगडी, टराटरा फाडून... सह्यगिरीच्या अंगोपांगी, घेई आनंद ऊडी हर्ष कडेलोट दोथडी त्रिशतकांती आज उदेली, शुभशकुनाची घडी धरूनी धोतरसोगा, निऱ्यांचा साव रूनीया घोळं ऐटीत देई मिशीला पीळ सह्याद्री हा तडतड चाले, होऊन अति व्याकूळं तयासोबती तशीच व्याकूळ, हुमानदांडगी पोरं अहो त्याचीच ही लेकरं पुढे धावती परकरी पोरी, चिवचिव करती फार ऊभा आडवा रगेल बांधा, पोरं ही राकट पीळदार देह दणकट सांगू लागता जणू वाटते वीजेचा कडकडाट रूबाबदार प्रचंडगड तो, लोहदूर...

सह्याद्री... बापदाद्यांची मिरासदारी

Image
खरंच कधी कधी सुचत नाही, का हे डोंगर इतकं वेड लावतात? इथले खळाळणारे झरे ओढे का भूलवतात? राजगड, रायगडात असं काय आहे की त्यास पाहता जीव खुळावतो? या नाळी, घाटवाटा पाहील्या की कोणाच्या पाऊलखुणा दिसू लागतात? हे बुरूज तटबंद्या पाहील्या की का छाती फुटावी इतका मोठा श्वास आपण घेतो? जवाब शोधत निघालो की मन भूतकाळावर बसून मागं मागं दौडत निघतं. अन पोहोचतो तीनशे वर्षापुर्वीच्या एका डोंगराच्या आड वसलेल्या खेड्यात. पुण्याच्या मावळतीस, कोरबारस मावळात, नानिवली गावात! पंधरा-वीस केंबळानी शाकारलेली घरं! गावाच्या शिवेवरचा हात ऊगारलेला मारूतराया! शेंदूर फासूफासून मूळ मुर्तीतला घडीवपणा पार लोपलेला. पण डोळे असे वटारलेले की काय बिशाद कोणत्या संकटाची गावाची शिव ओलांडायची. मळलेल्या धूळवाटेवरून आत निघालोय. पांदीच्या दोन्ही अंगानी आंब्या जांभळीनी वाटेवर सावली धरलेली.  दोन्ही बाजवांनी निरगुडीचा दाट कुसवा.  हे काय म्होरं गाव! तो कळस दिसतोय तो कमळजाईचा! बाजूच्या पारावर, भल्या ढंगाळ्या फणशीच्या सावलीत चार म्हातारी लंगोट लावलेली गप्पा हाणत बसलेली. बाजूस रणरणत्या मातीत पोरांचा इटीदांडू रंगलाय. अंग...

बाई जिजाऊ तुझ्या चरणी लोटांगण!

Image
बाई जिजाऊ तुझ्या चरणी लोटांगण! खरच कुठल्या मातीपासून घडली आई तू? कोण होता तुला घडवणारा? तुझं नशीब लिहीताना तर सटवीसुद्धा ऊर फुटून रडली असेल. काय कमी यातना, भोग लिहले का बाई तिनं तुझ्या भाळी! ओसाडलेली गावं, दुभंगलेल्या वेशी, कोसळलेली घरं, पडलेली मंदीरं, भंगलेल्या मुर्ती, हंबरणारी गाईगुजी, गांजलेली रयत, आक्रोशणाऱ्या अबला अवघे अवघे कल्लोळून, आक्रंदून, टाहो फोडफोडून पुकारत होते तुला! अन् तू आलीस अवघ्यांची मायमाऊली होऊन. ओसडलेली गावं वसवण्या! दुभंगलेल्या वेशी सांधण्या! कोसळत्या घरा बांधण्या! भंगल्या मुर्ती सावरण्या! धुमसणारी शेती फुलवण्या! हंबरणाऱ्या गाईगुजीस चारा भरवण्या! पिचलेल्या मन आणि मनगटास नवी ऊभारी देण्या... अवघ्या अवघ्यांस आपल्या शितळ पदराखाली घेण्यास! आजन्म चिंतेच्या ज्या चिता तुझ्या भोवताली भडकल्या त्याची झळ तू मुकाट साहिली पण तुझ्या पदराआड घेतलेल्या लेकुरवाळ्या महाराष्ट्रलेकरास त्याची झळ लागो दिली नाहीस. जिजाऊ! मोठ्या आभाळधीराची आहेस बाई तू! कणभरही तू डगमगली नाहीस! कुठून आलं ईतकं साहस तुझ्यात! राजगडी काळेश्वरी बुरूजापाशी धडाडली चिता! अन् अवघ्यांच्या काळजाचा थरकाप...