Posts

Showing posts from January, 2020

बाई जिजाऊ तुझ्या चरणी लोटांगण!

Image
बाई जिजाऊ तुझ्या चरणी लोटांगण! खरच कुठल्या मातीपासून घडली आई तू? कोण होता तुला घडवणारा? तुझं नशीब लिहीताना तर सटवीसुद्धा ऊर फुटून रडली असेल. काय कमी यातना, भोग लिहले का बाई तिनं तुझ्या भाळी! ओसाडलेली गावं, दुभंगलेल्या वेशी, कोसळलेली घरं, पडलेली मंदीरं, भंगलेल्या मुर्ती, हंबरणारी गाईगुजी, गांजलेली रयत, आक्रोशणाऱ्या अबला अवघे अवघे कल्लोळून, आक्रंदून, टाहो फोडफोडून पुकारत होते तुला! अन् तू आलीस अवघ्यांची मायमाऊली होऊन. ओसडलेली गावं वसवण्या! दुभंगलेल्या वेशी सांधण्या! कोसळत्या घरा बांधण्या! भंगल्या मुर्ती सावरण्या! धुमसणारी शेती फुलवण्या! हंबरणाऱ्या गाईगुजीस चारा भरवण्या! पिचलेल्या मन आणि मनगटास नवी ऊभारी देण्या... अवघ्या अवघ्यांस आपल्या शितळ पदराखाली घेण्यास! आजन्म चिंतेच्या ज्या चिता तुझ्या भोवताली भडकल्या त्याची झळ तू मुकाट साहिली पण तुझ्या पदराआड घेतलेल्या लेकुरवाळ्या महाराष्ट्रलेकरास त्याची झळ लागो दिली नाहीस. जिजाऊ! मोठ्या आभाळधीराची आहेस बाई तू! कणभरही तू डगमगली नाहीस! कुठून आलं ईतकं साहस तुझ्यात! राजगडी काळेश्वरी बुरूजापाशी धडाडली चिता! अन् अवघ्यांच्या काळजाचा थरकाप...