Posts

Showing posts from November, 2019
Image
राजगडास स्वर्गाची उपमा देणार नाही. कारण स्वर्ग किती जरी देखणा असला तरी राजगडाच्या दिमाखापुढे फिकाच. राजगडाचं सौंदर्य म्हणजे प्रुथ्वीमोलाचं अप्रुप. त्यात थोरल्या राजांचा त्यास लाभलेला जवळपास पंचवीस वरूषांचा सहवास. आता अधिक भाग्यवान कोणास म्हणावे. शिवरायांस ज्यांस असे दुर्गरत्न मिळाले की राजगडास ज्यांस छत्रपतींसम नररत्न.  असा हा दुर्गराज मिचमिचत्या डोळ्यांनी न्याहाळत झुंजार बुरूजाच्या ऊजवीस निघालो. द्वारातून खाली ऊतरता नजरेत भरते ऊगवतीकडे धावणारी सुवेळा नि दर्शन होतं शेजारच्याच तटबंदीच्या देवळीत विराजमान झालेल्या या तुंदीलतनू गणोबाचं. किती दशकं लोटली, तपं ओलांडली, शतकं पार झाली असतील पण हा गणोबा मात्र या राजगडीच्या घुमटीत निवांत विराजला आहे. न राहवून त्यास विचारलच, बाबा गणोबा इथं वावरणारे सगळेच परागंदा झाले. तुम्ही का अजून इथेच आहात? तर मला म्हणाले, "अरे बाबा दिलेला शब्द पाळतोय" "कसला शब्द नि कोणाला दिला होता शब्द" माझा आततायीपणा. मग सांगू लागला गणपतिबाप्पा त्याची कहाणी, "कैक वर्षे लोटली या गोष्टीस. पण असं वाटतय काल परवाचीच गोष्ट. या महाराष्ट्रमंडळी परचक्...