हा आमचा वारसदार...

अवघ्या १६ मिनीटं नि ४० सेकंदात दूर्ग लिंगाण्याचा गगनसुळका लीलया पार करणाऱ्या बा रायगड परिवाराचे शिलेदार सागरदादा नलवडे यांस बहू आदरे समर्पित... सागर नाव जरी, तरी ना, ध्येया किनाऱ्यांचे बंध ओहोटी ना पराक्रमा तव, सदा भरतीचा छंद कर्तृत्व जया रक्तात, तयांना परपंखांची गरज नसे त्रिवार अशक्य सर्वस्वी जे, सहजशक्य हो त्यास दिसे वैनतयाची अतूळ भरारी, अशी मारली जिद्दीने पंख असलेले पक्षी जाहले लज्जित तव झेपेने पुटपुटले असतील स्वतःशीच ते, "व्यर्थ आमचे जगणे पंखाची ना गरज गाठाया, ध्येयाची अपार गगने" अशीच घेतली पुराणकाळी, झेप बाल हनुमंताने कलियुगी या दिलास प्रत्यय, तुजिया सामर्थ्याने वामन बटुचा निश्चय भरला, तुझ्या पावलांत हा हा म्हणता करसि दूर्ग, लिंगाणा पादाक्रांत तत्क्षणी सह्याद्री धारेने या, असेल रोखला श्वास काळ नदीच्या घशास कोरड, पडली त्याच समयास बोराटा, सिंगापूर, आग्या या अवघ्या नाळी स्तब्ध कित्येक घाटा, कित्येक वाटा असतील तुजवर लुब्ध आभाळ कौतुक असेल दाटले, रायगडाच्या मनी "अचाट साहस, असेल पाहत तोही चार शतकांनी ...