Posts

Showing posts from February, 2020
Image
सुधागडावर महाद्वाराला कवाड बसविण्यास ज्या ज्या निष्ठावंत शिवपाईकांनी, धुलीकणांनी मोलाची कामगिरी साधली त्यांच्या सन्मानास्तव.... हे कवणपुष्प.... नटला दिमाखदार, सुधागड नटला दिमाखदार त्रिशतकांती कवाड लाभे, ऊघडले महाद्वार शिवकाळी या स्वराज्याप्रति सुधागडाची दूर्ग आक्रुती पाहुनी जडली शिवबा प्रीति "बुलंद होई राजधानी का?" राजा करी विचार शिवकाळाचे वैभव सरले कालचक्राचे जाते फिरले परवशतेचे जगणे ऊरले गिळून टाके गडास अवघ्या, दूर्लक्षित अंधार रणफंदी बा रायगडीचे शोभे मावळे गतजन्मीचे दुःख जाणिले सुधागडाचे धूलीकणांनी मनी ठाणला, संवर्धन निर्धार ठिणगी चमके एक मनातुनी सहस्त्र वणवे चेतले यातुनी शिवकार्याचा वसा घेऊनी हा हा म्हणता घेऊ लागले, स्वराज्य पुनः आकार शिवभक्ती ये दाटूनी पोटी महाद्वाराच्या पूर्तिसाठी रणवीरांच्या लवल्या पाठी शत शत राबती हात, मुखी शिवबा जयजयकार कुणी धनाने, कुणी मनाने प्रज्ञेने कुणी, कुणी श्रमाने अवघे झटले एक दिलाने धूसर होते स्वप्न जाहले मूर्तिमंत साकार मनी ना कुठले किंतु, परंतू वानरगण जणू बांधे सेतू तसा शिवराय मनी...

या मराठमुलुखी बाळ जन्मले, शिवबा छत्रपती...

Image
गुलामगिरीच्या काळ्याकुट्ट घोंगडीखाली झोपलेला महाराष्ट्र त्या राती खडबडून जागा झाला. अवघा सह्याद्री धोतराचा सोगा धरून, नीऱ्यांचा घोळ सावरीत धावू लागला. त्यासोबत होती त्याची दहाबारा तरणी, हुमानदांडगी पोरं. अन् चिमखड्या परकरी पोरी. सह्याद्रीची ती पोरं म्हणजे हे राकट गडकोट आणि चिमखड्या पोरी म्हंजी त्यावरून धावणाऱ्या नद्या. ही सगळीच नटूनथटून धावत होती. अन् त्यांच्यासोबत पदराआड बाळंतविडा झाकून धावत होती महाराष्ट्र मुलखातील देवदेवता. कुठं? जुन्नरपेठेत!कशाला??? निद्रीत अवघा महाराष्ट्र हा, ऊठला खडबडून पहा देई भिरकावून परवशतेची जख्ख घोंगडी, टराटरा फाडून... सह्यगिरीच्या अंगोपांगी, घेई आनंद ऊडी हर्ष कडेलोट दोथडी त्रिशतकांती आज उदेली, शुभशकुनाची घडी धरूनी धोतरसोगा, निऱ्यांचा साव रूनीया घोळं ऐटीत देई मिशीला पीळ सह्याद्री हा तडतड चाले, होऊन अति व्याकूळं तयासोबती तशीच व्याकूळ, हुमानदांडगी पोरं अहो त्याचीच ही लेकरं पुढे धावती परकरी पोरी, चिवचिव करती फार ऊभा आडवा रगेल बांधा, पोरं ही राकट पीळदार देह दणकट सांगू लागता जणू वाटते वीजेचा कडकडाट रूबाबदार प्रचंडगड तो, लोहदूर...

सह्याद्री... बापदाद्यांची मिरासदारी

Image
खरंच कधी कधी सुचत नाही, का हे डोंगर इतकं वेड लावतात? इथले खळाळणारे झरे ओढे का भूलवतात? राजगड, रायगडात असं काय आहे की त्यास पाहता जीव खुळावतो? या नाळी, घाटवाटा पाहील्या की कोणाच्या पाऊलखुणा दिसू लागतात? हे बुरूज तटबंद्या पाहील्या की का छाती फुटावी इतका मोठा श्वास आपण घेतो? जवाब शोधत निघालो की मन भूतकाळावर बसून मागं मागं दौडत निघतं. अन पोहोचतो तीनशे वर्षापुर्वीच्या एका डोंगराच्या आड वसलेल्या खेड्यात. पुण्याच्या मावळतीस, कोरबारस मावळात, नानिवली गावात! पंधरा-वीस केंबळानी शाकारलेली घरं! गावाच्या शिवेवरचा हात ऊगारलेला मारूतराया! शेंदूर फासूफासून मूळ मुर्तीतला घडीवपणा पार लोपलेला. पण डोळे असे वटारलेले की काय बिशाद कोणत्या संकटाची गावाची शिव ओलांडायची. मळलेल्या धूळवाटेवरून आत निघालोय. पांदीच्या दोन्ही अंगानी आंब्या जांभळीनी वाटेवर सावली धरलेली.  दोन्ही बाजवांनी निरगुडीचा दाट कुसवा.  हे काय म्होरं गाव! तो कळस दिसतोय तो कमळजाईचा! बाजूच्या पारावर, भल्या ढंगाळ्या फणशीच्या सावलीत चार म्हातारी लंगोट लावलेली गप्पा हाणत बसलेली. बाजूस रणरणत्या मातीत पोरांचा इटीदांडू रंगलाय. अंग...