आईसाहेब जिजाऊ

१७ जून. अवघ्या राज्याभिषेकाच्या अकराव्या दिवशी या माऊलीनं शिवरायाचा, स्वराज्याचा, जगाचा निरोप घेतला. अवघी हयात ज्या स्वप्नासाठी घालवली, ते पार पडताच सर्व मायेचे पाश तोडून या माऊलीनं स्वर्गाची वाट धरली. हा म्रुत्यू नव्हे, ती होती समाधी. आपलं कार्य पूर्ण होताच जी थोर योगी, संत घेतात ती समाधी. पण यावेळी राजाची अवस्था काय असेल. आईविना पोर ते. छे छे कल्पनाही साहवत नाही. पाचाडच्या वाड्यात जिजाऊंच्या त्या चिरशांत देहाकडे पाहत तिचा सिऊबा म्हणत असेल... शोधशोधुनी आई तुजला, येई जीव कंठाशी सोडुनी तव बाळास एकटी, गेली कोणत्या देशी हरिणीवाचून पाडस मी गं, भयाण काटेवनी सैरावैरा चहूकडे, हाकारी भेकभेकूनी कानोसा घेण्या क्षणैक थांबे, काने टवकारुनी जननीची परि साद येईना कासावीस कानाशी सोडुनी तव बाळास एकटी, गेली कोणत्या देशी अभिमाने गगनोंच जाहली, होती ज्याची मान तो रायगिरीही पायामध्ये, बसे शीर खुपसून रडती, स्फुंदती अनाथ झाला तो ही तुजवाचून किलकील करूनी लोचन त्याचे, भिडती पाचाडाशी सोडुनी तव बाळास एकटी, गेली कोणत्या देशी पहा वासरे, अवघ्या गाई, अखंड ढाळी नीर शोकाकूल ती मुकी पाखरे, शोधी तुज ...