राजगड तोरण्याच्या वाटेवरील झोपडे😗

राजगड तोरणा ट्रेक बरेच जण करतात. या वाटेवरच एक कौलारू झोपडं आहे. कोणी राहत नसलेलं. पण कधीकाळी ईथं नक्कीच कोणाचा तरी संसार फुलला असेल. राजीखुशीनं नांदला असेल. आज जरी झोपडीस अवकळा आलीय तरी कधीकाळी इथं गोकुळ नांदलं असल. या साऱ्याचीच आठवण काढीत ती म्हातारी झोपडी त्या बंबाळ्या रानात अनेक सह्य भटक्यांना घटकाभर निवारा झाली असेल... या झोपडीस समर्पित.... राजगड तोरण्याच्या वाटेवरी ते झोपडे वाट पाहत बसले, डोळे लाऊन वाटेकडे गगनोंच दोन दुर्ग, मध्ये इवलासा जीव गच्च बंबाळ्या रानाची, पर त्यास नाही भेव वाट पाहती कोणाची, प्राण आणुणीया दिठी तग धरली अजून, कोणाच्या गा भेटीसाठी किती झेलले या अंगी, ऊन पावसाचे डाव मोडकळले बिचारे, सोसे नियतीचे घाव अर्धे कौलारू झाकले, अर्धे उघडे बोडके भिंत ढासळली एक, वासे मोडके, तोडके कधीकाळी झोपडीत, चंद्रमौळी पंखाखाली असेल नांदला संसार, सोनियाच्या पावली कुण्या लक्षुमीने इथं, असेल थाटला संसार आज ओसाड पोरका, पसरला वाऱ्यावर मोडकी कोनाड्यात चूल, राख घेऊनीया पोटी भूई उकीर वाट पाहे, मायेनं सारवण्यासाठी तांब्या, ताटली, भगोनं, ऊशी, वाकळ जुनाट पसरली अस्त...