मार्केटिंग माणुसकीचं

प्रसंग पहिला १५ऑगस्ट. शिवार्थचा पहिला वाढदिवस. एका नामांकित ज्वेलर्सच्या दुकानात काहीतरी दागिना करावा या हेतूने गेलो. पाहता पाहता मुलास सोन्याचे पान, नवीन साखळ्या नि बरच काही खरेदी केलं. पान पटवून मुलाच्या गळ्यात घालावं म्हणून बाहेर आलो तर तिथला पटवेकरी आला नव्हता. बऱ्याच ठिकाणी पाहिलं. पण स्वातंत्र्यदिनामुळे दुसरे पटवेकरीच दिसेना. खूप शोधल्यावर एक मावशी बसलेल्या दिसल्या. त्यांना पान पटवायला दिले. त्यांचा हात सराईतासारखा सुरु झाला. हा हा म्हणता काळा दोरा, मधी सोनेरी धागा, त्यावर पान, पान सरकू नये म्हणून आणखी सोनेरी धाग्याने गच्च करीत त्यांनी आमच्याशी गप्पा मारता मारता ते मुलाच्या गळ्यात बांधलेदेखील. किती झाले? ३० रुपये मी पैसे दिले. पैसे घेता त्यांनी आम्हाला थांबायला सांगितले. व त्या कुठेतरी लगबगीनं गेल्या जेव्हा परतल्या तेव्हा त्यांच्या हातात ४० ची कॅडबरी होती. जी त्यांनी मुलांसाठी आणली होती. आमच्या नवराबायकोच्या बोलण्यातून त्यांना समजले कि आज पोराचा वाढदिवस आहे. मग रिकाम्या हातानं कसं पाठवायचं म्हणून ही कॅडबरी. आम्ही दोघेही त्या प्रसंगानं थक्क होतो. आमच्याकडून त्या मावशीची कमाई...